LWS राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा सातवी भाषा व गणित

Learning With Smartness Test Series

🏆 Certificate Test

उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या

एक मनुष्य अखंड जेवतो आणि दुसरा सतत उपाशी राहतो, हे निसर्गाला कधीच मंजूर नाही. एक मनुष्य दुसऱ्याचा मालक होऊ शकतो, हेसुद्धा मंजूर नाही. प्रत्येक जण स्वयंभू आहे. त्याचं अस्तित्व कुणाच्या दयेवर उभं नाही. एखादं उंच वडाचं झाड केवळ आकारानं, सामर्थ्यानं मोठं आहे, म्हणून त्याचं मोल जुईच्या फुलापेक्षा जास्त आहे असं नाही. निसर्गाला जाती मंजूर नाहीत, तसाच धर्मही मंजूर नाही. मी तुझ्यापेक्षा पवित्र आहे. असं सांगण्याच्या अहमहमिकेनं माणसांनीच धर्म निर्माण केले, पंथ निर्माण केले. निसर्गाला कुठला आला आहे धर्म ? तो ख्रिश्चन असतो की हिंदू की मुस्लीम ? निसर्गाला धर्म असलाच तर 'जगा आणि जगू दया' एवढाच असू शकतो. मानवी पावित्र्याचा कल्पनेनं निसर्ग बंदिस्त नाही, परंतु त्याच्या दृष्टीनं जीवनच पवित्र आहे. माणसांनी या पृथ्वीवर कसं जगावं हे शेवटी माणसांनीच ठरवायचं आहे.

Q1. निसर्गाला कोणती गोष्ट मान्य असते ?

Q2. वरील उताऱ्यातील आशयावरून असत्य विधान कोणते ?

Q3. माणसाच्या अहमहमिकेमुळे (अ) जीवन पवित्र झाले (ब) धर्म निर्माण झाले (क) पंथ निर्माण झाले

कविता वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या

हे परमात्मन्, जेथे न शिवे भीती मनाला काही, डोळे करूनी वर चालाया शंका वाटत नाही. जेथे असती मार्ग मोकळे ज्ञानाच्या प्राप्तीचे, संकोचाने तुकडे, तुकडे झाले नच जनतेचे. शुद्ध अशा त्या, सत्यावाचुनी शब्द न जेथे वाया, हात पसरितो उदयम संतत पूर्णतेस मिळवाया. मृत रुढीच्या भयाण पुलिनी पावुनिया लोपला, प्रज्ञेचा तो निर्झर निर्मळ लुप्तप्राय न झाला. कृपा प्रेरणा तुझीच कारण ज्या आचाराविचारा, होऊनि तद्विस्तार मनाच्या प्रगतिस मिळतो थारा. प्रभो ! अशा त्या स्वतंत्रतेच्या स्वर्गामाजी ताता ! होवो माझा देश निरंतर जागृत सत्वर आता.

Q4. कवितेच्या आशयानुसार स्वातंत्र्याचा कोणता फायदा सांगितला आहे ?

Q5. कवितेत कशाच्या मदतीची अपेक्षा केली आहे ?

Q6. कवितेतील वर्णनानुसार चुकीचे विधान कोणते ?

Q7. दिलेला शब्द व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा :

Q8. खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी परस्पर विरुद्धार्थी शब्दांची आहे ?

Q9. दिलेल्या शब्दांतील किती शब्द शुद्ध आहेत ? (व्यक्तिमत्त्व, तीर्थस्थान, तत्कालीन, श्रोतृवृंद, दुर्लोकीक, स्फुरण, पारंपरिक)

Q10. अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

Q11. अकरावा रूद्र (या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.)

Q12. वाक्प्रचाराच्या अर्थानुसार योग्य जोडी निवडा :

Q13. A)हे विशेषण विशेष्याच्या आधी येते त्याला अधिविशेषण म्हणतात. B) जे विशेषण विशेष्य याच्या नंतर येते त्यास विधी विशेषण म्हणतात.

Q14. 'बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती' या अर्थाची अचूक म्हण ओळखा :

Q15. 'अंतस्थ' या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिका सारखा होतो, अगदी तसाच उच्चार पुढीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारासारखा होतो ?

Q16. पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकांखेरीज कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले, तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते, या नियमात बसणारा जोडशब्द ओळखा.

Q17. 'हे सगळे 'अस्सेच्या असे' आपल्या आयुष्यातही खरोखरच घडेल.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण अव्यय प्रकार ओळखा.

Q18. 'परीकथा' या शब्दाचे योग्य सामान्यरूप कोणते ?

Q19. 'वेल मांडवावर विस्तारली.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Q20. 'उत्कृष्ट-सचित्र पुस्तक आपल्या संग्रही ठेवले, तर किमान भारतीय नाण्यांपुरते आपले ज्ञान वाढेल.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q21. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात ?

Q22. 'आजोबांनी वर्तमानपत्रातल्या सर्व बातम्या वाचून काढल्या.' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा :

Q23. समासाच्या वैशिष्ट्यानुसार अयोग्य विधान कोणते ?

Q24. पुढीलपैकी म. जोतीराव फुले यांची कोणती साहित्यकृती नाही ?

Q25. खालीलपैकी कोणत्या टोपणनावाने त्यासमोर दिलेल्या साहित्यिकास ओळखले जात नाही ?

Q26. एका शाळेतील इ. 8 वीच्या वर्गाच्या B तुकडीतील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा 20 ने कमी आहे. त्या तुकडीतील मुलांची एकूण संख्या 68 असेल, तर मुलींची संख्या किती ?

Q27. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा : (अ) 182 या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो (ब) 182 या संख्येला 7 ने निःशेष भाग जातो (क) 182 या संख्येला 14 ने निःशेष भाग जातो

Question image

Q28.

Question image

Q29. आकृतीत रेषा AB || रेषा CD असून रेषा PR छेदिका आहे... आंतरकोनांच्या एका जोडीचे कोनदुभाजक बिंदू 'T' मध्ये छेदतात, तर कोन PTR चे माप किती ?

Q30. साखरेचा दर 25% ने वाढला त्यामुळे खप 15% ने कमी झाला, तर शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला ?

Q31. एका वस्तूची किंमत 20% ने वाढली, काही दिवसांनी पुन्हा 20% ने कमी झाली. तर शेवटची किंमत मूळ किंमतीपेक्षा कमी होईल का जास्त ? कितीने ?

Q32. एका चौरसाचा कर्ण 7 सेमी आहे. तर त्याच्या बाजूची लांबी किती ?

Q33. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 14 सेमी आहे... त्या पाण्यात 14 सेमी लांब, 11 सेमी रुंद व 12 सेमी उंच असलेला धातूचा ठोकळा टाकला असता पिंपातील पाण्याची उंची किती वाढेल ?

Q34. एका कोनाचा पूरककोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13:4 आहे, तर त्या कोनाचे माप किती ?

Q35. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135° आहे, तर त्या कोनाच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल ?

Q36. एका मोटारीचा ताशी वेग 50 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यास 6 तास लागतात. त्याच वाहनाने त्याच गावाला 4 तासात पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा ?

Q37. एका दुकानदाराने 200 रु. डझन या दराने 50 डझन वह्या विकत घेतल्या. त्या सर्व वह्या 225 रु. डझन दराने विकल्या, तर त्याला शेकडा नफा किती झाला ?

Q38. O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे. त्या वर्तुळातील एका जीवेचे वर्तुळकेंद्रापासूनचे अंतर 5 सेमी आहे, तर त्या जीवेची लांबी किती ?

Q39. 21 ते 30 पर्यन्तच्या मूळसंख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो ? (अ) 3 (ब) 7 (क) 151 (ड) 17

Q40. एका त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांची मापे अनुक्रमे 140° व 130° आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे ?

Q41. कवायतीसाठी इ. 6 वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली व 8वीच्या 60 मुलींना क्रीडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या रांगेत उभे करावयाचे आहे... एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील ?

Q42. 33 सेमी लांब, 18 सेमी रुंद व 8 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाचिती वितळवून 0.2 सेमी जाडी व 6 सेमी व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील ?

Q43. शोभाताईनी एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्षी 8% ने कमी होतो. दोन वर्षांनंतर त्यांनी ती स्कूटर विकली, तर त्यांना किती रुपये मिळतील ?

Q44. एका वर्गातील 20 मुलांची उंची दर्शविणारी वारंवारता सारणी दिली आहे. त्या उंचीचे मध्यमान किती असेल ?

Q45. 13 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाच्या एका कर्णाची लांबी 24 सेमी असल्यास, दुसऱ्या कर्णाची लांबी किती ?

Q46. अनुराधाने एका बँकेत 15,000 रुपये 3 वर्षासाठी सरळव्याजाने ठेवले. तिला मुदतीअंती 24,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती होता ?

Q47. एका शंकूचे वक्रपृष्ठफळ 204.1 चौसेमी आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 5 सेमी असल्यास त्याची लंबउंची किती असेल ? (π = 3.14 घ्या)

Question image

Q48.

Q49. चंद्रपालने 9 लाख रुपयास खरेदी केलेला एक भूखंड शेकडा 15 नफ्याने विकला, तर त्याला किती रुपये मिळतील ?

Question image

Q50.

Q51. एका सभागृहाची लांबी 20 मीटर व रुंदी 17 मीटर आहे. त्या सभागृहात अर्धामीटर बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायचा आहेत, तर अशा किती फरशा लागतील ?

Q52. 720 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 7 ठिकाणी कापली, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती डेसिमीटर होईल ?

Question image

Q53.

Q54. एक दुकानदार मोबाईलच्या छापील किंमतीवर 8% सूट देतो. त्याने एक मोबाईल 18,400 रुपयास विकला, तर त्या मोबाईलची छापील किंमत किती ?

Q55. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 35 मी आहे. त्या बागेभोवती तारेचे चार पदरी कुंपण घालण्यासाठी प्रतिमीटर 44 रुपये प्रमाणे किती खर्च येईल ?

Q56. एका चौरसाची बाजू 12 सेमी आहे. हा चौरस कर्णावर कापला, तर तयार झालेल्या त्रिकोणांपैकी एका त्रिकोणाची परिमिती किती ?

Q57. एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 12 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?

Question image

Q58. खालीलपैकी कोणती राशी बहुपदी नाही ?

Q59. एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 5 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती ?

Q60. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास 2.1 मी. आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले, तर कापलेले अंतर किती ?

Q61. शीतलकडे जेवढी 5 रु. ची नाणी आहेत तेवढ्याच 20 रुपयांच्या नोटा आहेत. तिच्याकडे एकूण 600 रुपये आहेत, तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती ?

Q62. (5m + 7n) ची बेरीजव्यस्त संख्या व (-2m - 3n) ची बेरीजव्यस्त संख्या यांची बेरीज किती ?

Question image

Q63. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे ?

Q64. एकच शिरोबिंदू नसलेल्या दोन कोनांची मापे 35° व 55° आहेत, तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

Question image

Q65. विभाजित स्तंभालेखावरून: एकूण किती बालकांनी पोलीओ डोझ घेतला नाही ?

Q66. विभाजित स्तंभालेखावरून: प्रभाग A व प्रभाग D यांच्यामधील पोलिओ डोझ घेतलेल्या बालकांचे गुणोत्तर किती ?

Q67. 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी, क्रमवार 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे ?

Q68. एक काम 30 मुले 40 दिवसात पूर्ण करतात. जर 4 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असतील, तर तेच काम 30 पुरुष किती दिवसांमध्ये पूर्ण करतील?

Q69. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. त्याच्या दुप्पट काम 20 मजूर 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?

Q70. एका प्राणीसंग्रहालयातील सर्व प्राणी अव्यंग असून हरिण व बदके यांच्या पायांची संख्या 52 व डोक्यांची संख्या 19 आहे, तर संग्रहालयातील बदकांची संख्या किती असेल?

Q71. एका परीक्षेत 30% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 25% विद्यार्थी मराठीत नापास झाले व दोन्ही विषयांत 10% विद्यार्थी नापास झाले, तर किती टक्के विद्यार्थी पास झाले?

Q72. 10 मांजरे 10 उंदीर 10 मिनिटात खातात, तर 1 मांजर 1 उंदीर किती मिनिटात खाईल?

Q73. खालील संख्या रोमन संख्यात कशी लिहाल 169

Q74. खालील रोमन संख्या म्हणजे CDXLIV

Q75. 1000 या संख्येसाठी कोणते रोमन संख्या चिन्ह वापराल?

Created by Aditya Lad · Pune, India ·