प्र. क्र. 18 व 19 साठी सूचना: खालील संवाद वाचून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा.
"अरे रामू, झाले का झाडांना पाणी घालून ?"
"हो गुरुजी, आता काय करायचे ?"
"आता आपण पाणवठ्यावर जायचे आहे. तेथे आपण पाण्याचे उपयोग व पाण्याचे प्रदूषण कसे होते, याची माहिती घेऊ."
"नमस्कार, गुरुजी !"
"नमस्कार, काका या !"
"गुरुजी, शाळेचे नंदनवन केले तुम्ही ! मुलांना कामात रमवलतं."
"मनापासून केलेल्या गोष्टीला सुंदर रूप येते काका."
"खरे सांगू गुरुजी, हे सर्व पाहून गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनची आठवण येते. चार वर्षांपूर्वी हा चार भिंतीमधला कोंडवाडा होता. तुमच्या कष्टांना आज अर्थ आला." सरपंच म्हणाले.