स्कॉलरशिप परीक्षा चौथी उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या

Scholarship Exam 4th Class

🏆 Certificate Test

उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.

15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे सर्व शाळांमध्ये झेंडावंदन करतात. तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत 17 सप्टेंबर (मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन) या दिवशी शाळांमध्ये झेंडावंदन करतात. तिरंगी झेंडा हा आपला राष्ट्रध्वज आहे. त्यात तीन रंग आहेत. म्हणून त्याला तिरंगी म्हणतात. तिरंगी झेंड्यात वरच्या बाजूला केशरी मध्यभागी पांढरा, तर खाली हिरवा असे तीन रंग असतात. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र असते. त्याला 24 आरे असतात.

Q1. तिरंगी झेंडा हा आपला .......... आहे.

Q2. तिरंगी झेंड्यातील सर्वांत खाली कोणता रंग असतो?

Q3. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन केव्हा साजरा करतात?

उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.

नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी भाग आहे. तेथे सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत. तेथे जंगल आहे. त्या जंगलात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. तिथे आमची सहल गेली होती. तिथे आम्हाला अनेक प्रकारची झाडे, झुडपे, वेली आणि पक्षी पाहायला मिळाले. बाईंनी आम्हाला पक्ष्यांची, झाडांची, वेलींची नावे सांगितली. जंगलात हिंडताना आम्ही खूपखूप करमले आणि इतर अनेक रानफळे खाल्ली. बाईंनी आम्हाला तलावाजवळ घेऊन गेल्या. तलावाच्या काठावर झाडाच्या सावलीत बसून आम्ही गाणी म्हटली. भेंड्या खेळलो, नकलां केल्या.

Q4. तलावाच्या काठावर बसून मुलांनी काय केले नाही?

Q5. मुलांची सहल कोठे गेली होती?

Q6. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उताऱ्यात आलेला नाही?

उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.

रामाईचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बांधे गाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भीमराव तर आईचे नाव रघमाबाई असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. 1907 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. बाबासाहेबांनी रामाईंना घरी लिहायला वाचायला शिकवले

Q7. बाबासाहेबांच्या पत्नीचे नाव काय होते?

Q8. रमाईंना लिहिणे-वाचणे कुणी शिकवले?

Q9. बाबासाहेब किती साली मॅट्रिक झाले?

उतारा वाचा प्रश्नांची उत्तरे द्या.

बापूंचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. आपण त्यांना ‘राष्ट्रपिता’, ‘महात्मा’ म्हणतो. त्यांची राहणी साधी, पोशाख साधा, खादीचे आखूड धोतर, पायात वहाणा, हातात काठी, डोळ्यांवर गोल चष्मा, कमरेला गोल घड्याळ, गांधीजी आश्रमात राहत. पहाटे लवकर उठत, स्वतःचे काम स्वतः करत. ते चरख्यावर सूत कातत. गांधीजींना मुले खूप आवडत. मुले त्यांना प्रेमाने ‘बापू’ म्हणत.

Q10. आपण गांधीजींना पुढीलपैकी .......... असे म्हणत नाही.

Q11. पुढीलपैकी गांधीजींच्या पोशाखाचा भाग नसलेला पर्याय कोणता?

Q12. गांधीजींच्या बाबतीत चुकीचे विधान कोणते?

उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या

इ. स. 1858 साली बंगालमध्ये सर जगदीशचंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बोस हे प्रसिद्ध न्यायाधीश होते. जगदीशचंद्र हे लहानपणापासूनच आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या प्रत्येक बाबीबद्दल कुतूहलाने वडिलांना प्रश्न विचारत. वडील सुद्धा न चिडता त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती वाढवत. शेतकऱ्यांची मुले हे जगदीशचंद्रांचे शाळेतील मित्र होते. त्यांच्याकडून झाडांबद्दल त्यांना विविध माहिती ऐकायला मिळत असे. त्यामुळे त्यांना झाडांविषयी विशेष आकर्षण वाटू लागले. परदेशात जाऊन जगदीशचंद्रांनी तीन वर्षे वृक्षशास्त्राचा अभ्यास केला. मनुष्य प्राणी आणि वृक्षजीव यांत खूपच साम्य आहे हे त्यांच्या लक्षात आले.

Q13. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म किती साली झाला होता?

Q14. परदेशात जाऊन जगदीशचंद्र बोस यांनी कोणत्या विषयाचा अभ्यास केला?

Q15. .......... हे जगदीशचंद्रांचे शाळेतील मित्र होते.

प्र. खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा.

महात्मा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली. मुली शिकल्या तर समाजाची लवकर प्रगती होईल, असे महात्मा जोतीराव फुले यांचे मत होते. सावित्रीबाई त्या शाळेत शिकवू लागल्या, त्यामुळे मुलींची संख्या वाढत गेली. फातिमा शेख या त्यांच्या सहकारी शिक्षिका होत्या. सावित्रीबाईंनी जातिभेद पाळला नाही. अनाथ मुलांना आईची माया दिली. महात्मा जोतीरावांच्या निधनानंतर त्यांनी समाजकार्य जोमाने पुढे चालवले.

Q16. महात्मा फुले यांनी मुलीसाठी पहिली शाळा कुठे सुरू केली?

Q17. सावित्रीबाईंच्या सहकारी शिक्षिका ……….. या होत्या.

Q18. सावित्रीबाई यांनी पुढीलपैकी कोणती गोष्ट केली नाही?

उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.

सावळा वाघ्याकडे निघाला होता. त्याचा अवखळ, कारवानी घोडा आज शांत चालला होता. सावळ्याचा देह धिपाड होता. मोठे मस्तक त्यावर तेवढेच मोठे पागोटे, रुंद चेहरा, तीक्ष्ण डोळे, दाट भुवया, पिवळसर मिशा, भरदार गळा आणि हातात तलवारी लखलखीत कुंडा असा तो सावळा घोड्यावर बसला होता. त्याची नजर त्याच्यापुढे धावत होती

Q19. सावळ्याच्या घोड्याचे वर्णन करणारा पुढीलपैकी कोणता शब्द नाही?

Q20. सावळा कोठे चालला होता?

Q21. शरीर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

Q22. बबू कोणते काम करायचा?

Q23. बबू हा कोणत्या प्रकारचा मुलगा नव्हता?

Q24. उताऱ्यातील वर्णन कशाचे आहे?

खाली दिलेला उतारा वाचा व त्या खालील प्रश्न 1 ते 5 ची उत्तरे द्या

शेतात पीक पिकवणाऱ्या व्यक्तीला शेतकरी म्हणतात. तो एका गावात राहतो. तो नेहमीच खूप मेहनत करतो. तो पिके घेतो आणि जनावरेही वाढवतो. तो सकाळी लवकर उठतो आणि शेतात कामाला लागतो. तो बैलजोडी सोबत घेऊन शेत नांगरतो. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत काम करतो. शेतकरी अत्यंत साधे आणि खडतर जीवन जगतो. त्याचे उत्पन्न खूपच कमी आहे. शेतकऱ्यांचे जीवन त्याच्या जमिनी आणि जनावरांवर अवलंबून असते. शेतकरी खूप महत्वाचे आहेत कारण ते आपल्याला आपण जे अन्न खातो ते देतात.

Q25. शेतकरी प्रामुख्याने ----------- राहतात.

Q26. ते ------------ घेतात ------------ आणि वाढवतात.

Q27. शेतकरी का महत्वाचे आहेत?

उतारा वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या.

दृश्यांचे चित्रीकरण करताना दिग्दर्शकाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागले. समस्या अशी होती की, त्याने निवडलेले ठिकाण एखादया शहरापासून वा खेड्यापासून फार दूर होते. नजर पोहोचेल तिथतवर केवळ वाळू आणि मधेमधे काटेरी झुडुपे व वाळलेले गवत. वाळवंटामधून रेल्वेचा मार्ग असा गेला होता की, त्याला ना आदि ना अंत. चित्रीकरण जैसलमेरमध्ये होते आणि कामावरच्या लोकांना सगळे सामान त्या निवडलेल्या जागी घेऊन यावे लागले होते. आगगाडीच्या दिशेने धावणाऱ्या उंटांना पकडण्यासाठी कॅमेरामनना उघड्या जीपमध्ये शिरावे लागले होते. त्याकरिता, चित्रीकरणासाठी त्या जागेवर कॅमेरा आणून उंटांसाठी जवळच एक खोदलेला रस्ता असणे आवश्यक होते. त्यानंतरची गोष्ट म्हणजे एक आगगाडी मिळवणे. अचानकच कोळशाचे भाव वाढले आणि ते ज्या आगगाडीचा उपयोग करणार होते, ती एका दिवसाच्या सूचनेने रद्द करण्यात आली.

Q28. चित्रपटाचे चित्रीकरण होणार होते -

Q29. उघड्या जीपची गरज होती, कारण ____

Q30. आजूबाजूला सर्वत्र काटेरी झुडपे होती, कारण ___

Created by Aditya Navnath Lad · Pune, India · 9226778980 · adityanlad@gmail.com