TET Exam
Q1. वृकस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अॅड्रेनलिन या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो?
Q2. "व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय." अशी व्यक्तिमत्त्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली ?
Q3. मंदगतीने अध्ययन करणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे?
Q4. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे?
Q5. शैशवावस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करुन घेते व ज्यावेळी वर्तमान विचारपध्दतीनुसार एखादया उद्दिपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा क्रिया घडते
Q6. दोन अध्ययन पद्धतींमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरुपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली?
Q7. परीक्षेत साधे यश मिळाल्यास "मी मुळीच अभ्यास केला नव्हता, तरी मला इतके गुण मिळाले" असे सांगत सुटणे म्हणजे संरक्षण यंत्रणेचा वापर करणे.
Q8. लेवीनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता ? 'अ' गट (शास्त्रज्ञ) i) मन ii) वूडवर्थ iii) गेटस् iv) सिगोल 'ब' गट (व्याख्या) अ) अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय. ब) अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तनबदल होय. क) अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय. ड) अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे.
Q9. "स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय." ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली ?
Q10. स्पिअरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
Q11. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
Q12. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे?
Q13. धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे?
Q14. दोन घटना एकामागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. परीक्षेला जातांना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे होते.
Q15. मन यांच्या मते पुर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे .....
Q16. अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते राबवावे ? अ) दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करुन घ्यावे. ब) खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा. क) वाद्यवादन करून घ्यावे. ड) प्रदर्शन मांडणी करुन घ्यावी.
Q17. ज्ञानेंद्रिय उद्दिपीत न होता एखादया पुर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोप् विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे?
Q18. हरवलेले नाणे शोधतांना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो, चांदण्या रात्री दूर एखादे झुड पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रियभ्रम दोषामुळे होते ?
Q19. केवळ ज्ञानेंद्रिय उद्दिपीत होऊन जी प्राथमिक स्वरुपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांम संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे?
Q20. मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत् घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो?
Q21. प्रत्येक बालक हे वेगळे असून, ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात ?
Q22. अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रि घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही
Q23. योग्य जोड्या लावा खाली अध्ययनाची व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांचा योग्य जोड्यांचा पर्याय कोणता
Q24. अध्ययन करतांना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात ? अ) विद्यार्थ्यामध्ये अभिरूची निर्माण करावी. ब) प्रेरकाची तीव्रता कमी करावी. क) कौशल्य संपादन करतांना चुकीच्या सवयी आत्मसात करु देऊ नये. ड) वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे.
Q25. "अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय." अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली ?
Q26. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही?
Q27. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगांचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे?
Q28. प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत ? अ) चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी. ब) स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी. क) नीर विवेक बुद्धि निर्माण व्हावी. ड) समस्येची उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी.
Q29. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो, ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली ?
Q30. अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही?